|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » घोटवडेतील पेट्रोल पंपावर छापा

घोटवडेतील पेट्रोल पंपावर छापा 

कौलव / वार्ताहर

    राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथील बालाजी पेट्रोल पंपावर क्राईम ब्रँच ठाणे आणि एल.सी.बी. कोल्हापूर शाखेच्यावतीने तपासणी करण्यात आली. यावेळी इस्सार कंपनीच्या तेलाच्या विक्रीमध्ये मापात नगण्य तूट असल्याची निदर्शनास आले. पाच लिटरच्या पाठीमागे तीस मिली विधी ग्राह्य तूट असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालाजी पेट्रोल पंप वीस जुलैपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णय छापा टाकणाया अधिकायांनी घेतला आहे. 

      राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे बालाजी पेट्रोलिंक पंप आहे. हा पंप घोटवडे येथील डोंगळे बंधुच्या मालकीचा असून इस्सार कंपनीचे पेट्रोल, डिझेल विक्री केले जाते. जिह्यातील पेट्रोल पंप तेल विक्रीमध्ये गोलमाल असल्याच्या बातम्या ठाणे क्राईम ब्रॅंच विभागाला लागल्या आहेत. त्यानुसार गोपनीय पद्धतीने ठाणे क्राईम ब्रॅंच यांच्यावतीने मंगळवारी दुपारी छापा टाकण्यात आला. दुपारी दोन वाजलेपासून पंप कारवाईचा बडगा सुरु केला होता. क्राईम ब्रॅंच ठाणेचे अधिकारी विकास घोडके, अविनाश महाजन, कोल्हापूर एल.सी.बी.चे अधिकारी, पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी मिळून बालाजी पेट्रोल पंपाची चौकशी सुरू केली. या कारवाईत पाच लिटर पेट्रोलमध्ये तीस मिलीची विधीग्राह्य तूट असल्याचे अधिकायांनी सांगितले.

पेट्रोल पंपावर तेल भरणाऱया ग्राहकांनी मापात माप असा प्रकार आढळल्यास किंवा संशय आल्यास क्राईम ब्रॅंच विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन पुरवठा विभाग आणि क्राईम ब्रॅंच विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पेट्रोल विक्रीत मापात माप हा प्रकार केल्यामुळे हा पेट्रोल पंप वीस जुलै पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.

– विकास घोडके, क्राईम ब्रॅंच, पोलीस निरीक्षक.

घोटवडे येथील बालाजी पंप कारवाईत अंकुश भोसले, सुरेश यादव, संतोष सुर्वे, प्रशांत मोरके, सुरेश चव्हाण, पुरवठा विभागाचे विलास तोडकर, विनायक लुगडे यांनी सहभाग घेतला होता. घोटवडे येथील पेट्रोल पंपावर कारवाईमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पेट्रोल विक्रीत गोलमाल कोठे होत असल्यास शासकीय यंत्रणेकडे कळवण्यात यावे, असे आवाहन शासकीय अधिकाऱयांनी केले आहे.