|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा परिषदेतर्फे ‘लोकसंख्या स्थिरता’ जनजागृती रॅली

जिल्हा परिषदेतर्फे ‘लोकसंख्या स्थिरता’ जनजागृती रॅली 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

Rजागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे मंगळवारी ‘लोकसंख्या स्थिरता’ रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरूवात जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक यांच्या हस्ते करण्यात आली. रॅलीमध्ये मेन राजाराम हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅली मार्गावर विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी बॅनर व फलकाव्दारे जनजागृती केली.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी, अमर्याद वाढणारी लोकसंख्या त्यामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावर करावयाची उपाययोजना याबाबत जिल्हा परिषदेतर्फे समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. याअंतर्गत  लोकसंख्या दिन एक दिवसापुरता मर्यादेत न ठेवता दि.27 ते 10 जूलै या कालावधीत ‘दांपत्य संपर्क’ पंधरवडा तर दि.11 ते 24 जुलै या कालावधीत ‘लोकसंख्या †िस्थरता’ पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, आरोग्य समिती सदस्या स्नेहा जाधव, सविता भाटळे, कोमल मिसाळ यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पाटील, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ.फारूक देसाई, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.यु.जी.कुंभार, जिल्हा रूग्णालयाचे बाहय संपर्क अधिकारी डॉ.विलास देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेकडील सर्व विभागप्रमुख, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी, महिलांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन ‘अंतरा’ सुरूवातीच्या टप्यामध्ये जिल्हा रूग्णालयात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. इंजेक्शनच्या वापरामुळे तात्पुरत्या कुटुंब नियोजन पध्दतीमध्ये हे एक प्रभावी साधन उपलब्ध झाले आहे, असे सांगितले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस.पाटील, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.शानभाग, डॉ.गोडबोले, डॉ.विलास देशमुख, डॉ.फारूक देसाई, डॉ.यु.जी.कुंभार, जिल्हा रूग्णालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.