|Thursday, July 27, 2017
You are here: Home » Top News » चंद्रकांत खैरेंच्या खासदार निधीची उपजिल्हाधिकाऱयांकडून चौकशीचंद्रकांत खैरेंच्या खासदार निधीची उपजिल्हाधिकाऱयांकडून चौकशी 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी अस्तित्त्वात नसलेल्या गावांमध्ये विकासकामे केल्याचे भासवून निधी लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी कन्नडच्या उपजिल्हाधिकाऱयांकडून गावोगावी चौकशी करण्यात येत आहे.

शिवसेनेचे खासदार खैरे यांनी पंतप्रधान संसद ग्राम योजनेंतर्गत त्यांच्या मतदारसंघातील गावांची विकासकामे केल्याचे दाखवून प्रत्येक गावाला प्रत्येकी 9 लाखांचा निधी दिल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात ती गावे अस्तित्त्वातच नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे खासदार खैरे यांनी विकासकामे केल्याचे दाखवून निधी लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कन्नडच्या उपजिल्हाधिकाऱयांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!