|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एसीपी शिवकुमार यांचा बदलीनिमित्त सत्कार

एसीपी शिवकुमार यांचा बदलीनिमित्त सत्कार 

प्रतिनिधी /बेळगाव :

बढतीवरून बदली झालेल्या मार्केटचे एसीपी शिवकुमार एन. यांचा बुधवारी रात्री खासगी हॉटेलमध्ये पोलीस दलाच्यावतीने सत्कार करण्यात आला. बेंगळूर येथे त्यांची बदली झाली आहे.

कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, अमरनाथ रेड्डी, एसीपी गुरुशांतप्पा, शंकर मारिहाळ, पोलीस निरीक्षक डी. सी. लक्कन्नावर, अरुण नागेगौडा, जे. एम. कालीमिर्ची, चन्नकेशव आदींसह शहरातील पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सीमा लाटकर व अमरनाथ रेड्डी यांच्या हस्ते शिवकुमार यांचा शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी मार्केट एसीपीपदी नियुक्ती झालेल्या शंकर मारिहाळ यांचे स्वागत करण्यात आले. पोलीस अधिकाऱयांनी शिवकुमार यांना शुभेच्छा दिल्या.  

Related posts: