|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » …तरच होणार माल्या प्रकरणाची सुनावणी : सर्वोच्च न्यायालय

…तरच होणार माल्या प्रकरणाची सुनावणी : सर्वोच्च न्यायालय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोटय़वधींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या प्रकरणाची सुनावणी घेण्यास न्यायालयाने आजही नकार दिला. विजय माल्ल्या स्वतः न्यायालयात हजर असला तरच याप्रकरणाची सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला स्पष्ट केले.

देशातील विविध बँकांचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज बुडवून माल्ल्याने परदेशात पलायन केले आहे. तो सध्या लंडनमध्ये असल्याने याप्रकरणाच्या सुनावणीस अडथळे येत आहेत. विजय माल्ल्या या सुनावणीस स्वतः हजर नसल्याने खटल्याची सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, माल्ल्या सुनावणीदरम्यान स्वतः हजर राहिल्यास या प्रकरणाची सुनावणी करुन त्याला शिक्षा सुनावण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

Related posts: