|Saturday, May 25, 2019
You are here: Home » उद्योग » बेंगळूरस्थित कंपनी गुगलच्या खिशात

बेंगळूरस्थित कंपनी गुगलच्या खिशात 

कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारी कंपनी ‘हल्ली लॅब्स’ची खरेदी

वृत्तसंस्था/ बेंगळूर

बेंगळूर येथे मुख्यालय असणारी हल्ली लॅब ही कंपनी गुगलकडून खरेदी करण्यात आली. कंपनीचे सहसंस्थापक आणि स्टेझिलाचे प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी पंकज गुप्ता यांनी कंपनी गुगलकडून खरेदी करण्यात आल्याचे जाहीर केले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. जुन्या समस्या आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने सोडविण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली. यामुळे लोकांना आवडत्या गोष्टी सहजपणे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हाताळता येतील असे कंपनीने म्हटले. गुगलकडून पहिल्यांदाच भारतीय कंपनीचे अधिग्रहण झाले आहे.

विशेष बाब म्हणजे बेंगळूरच्या या कंपनीची स्थापना केवळ 4 महिन्यांपूर्वीच झाली आहे. हल्ली लॅब अधिग्रहण करण्यासाठी किती रुपयांचा हा व्यवहार झाला, याची आकडेवारी जारी केली नाही. गेल्या काही महिन्यात ऍपल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांकडून कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित कंपन्या खरेदी करण्यात येत आहेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 34 कृत्रिम बुद्धिमत्तेवर कार्यरत असणाऱया 34 स्टार्टअप्स्चे अधिग्रहण करण्यात आलेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे.

हल्ली लॅब सध्या वेगाची ओळख करणे आणि नैसर्गिक भाषेवर प्रक्रिया करणे यावर कार्यरत आहे. कंपनीकडून कोणतेही तंत्रज्ञान अद्याप ग्राहकांपर्यंत नेण्यात आलेले नाही.

Related posts: