राज्यात पावसाचे पुनरागमन

ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या जवळपास वीस दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यभरात दमदार पुनरागमन केले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, कोकण परिसरात गुरूवारपासून दमदार पाऊस सुरू झाला असून पुणे, नगरसह पश्चिम महाराष्ट्रातही एनक ठिकाणी पावसाची चांगली नोंद झाली आहे.
नाशिक, कोकणात पावसाने कहर केला असला, तरी पाऊस परतल्याने शेतकरी सुखावले आहेत. पुणे शहर आणि परिसरात गुरूवारपाठोपाठ शुक्रवारी पावसाचे हजेरी कायम होती. रात्री साडेआठपर्यंत 2.6 मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. पुढील दोन दिवसांत पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.