|Sunday, June 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मधुर भांडारकरांचे कार्यक्रम काँग्रेसने उधळले

मधुर भांडारकरांचे कार्यक्रम काँग्रेसने उधळले 

‘इंदू सरकार’विरोधात एल्गार, पत्रकार परिषदही रद्द

वार्ताहर/ पुणे

आणीबाणीच्या निर्णयावर आधारित असलेल्या मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेस पक्षाने विरोध करत शनिवारी पुणे शहरातील मधुर भांडारकरचे तीन कार्यक्रम उधळले. काँग्रेस नेत्यांच्या परवानगीशिवाय हा चित्रपट पुणे शहरात प्रदर्शित केल्यास काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व चित्रपटाचे प्रदर्शन रोखून धरतील, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने देण्यात आला. दरम्यान, मधुर भांडारकर यांनी भेटावयास नकार दिल्याने तसेच आंदोलनासाठी पूर्वपरवानगी न घेतल्याने काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. 

मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला असलेला विरोध काँग्रेसने याआधीच जाहीर केला आहे. मात्र, आज पुण्यात एका हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केले. गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली असल्याची माहिती मधुर भांडारकर यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्यावतीने हॉटेल क्राऊन प्लाझा समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

 मधुर भंडारकर यांनी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषद एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार एंड किचन या हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजता ठरली होती. मात्र काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करु शकतात, हे लक्षात आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर भांडारकर बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिटय़ूटमधील पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र, त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने मधुर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवलील क्राऊन प्लाझा या ठिकाणी पोहचले.

 क्राऊन प्लाझा येथे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी जोरदार विरोध केला. या विरोधानंतर रमेश बागवेंसह काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मधुर भांडारकर हे सध्या क्राऊन प्लाझा हॉटेलमधील त्यांच्या रुममध्ये आहेत. सायंकाळी विमानाने त्यांना मुंबईला जायचे आहे. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते हॉटेलची लॉबी, पार्किंग आणि एअर पोर्टच्या प्रवेशद्वारावर बसून आहेत. हॉटेल क्राऊन प्लाझा आणि एअरपोर्टला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related posts: