|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सचिन पिळगावकर बनले गझलकार ‘शफक’

सचिन पिळगावकर बनले गझलकार ‘शफक’ 

गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘ती आणि इतर’ चित्रपटासाठी आगळ्यावेगळ्या भूमिकेत

प्रतिनिधी/ मुंबई

मराठी चित्रपटसफष्टीतले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर प्रथमच ‘कवी’च्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, नफत्यदिग्दर्शक, गायक आणि निर्माता अशा चित्रपटसफष्टीच्या विविध कक्षा पडताळून पाहणारे सचिन पिळगावकर आता ‘ती आणि इतर’ या आगामी सिनेमाचे गझलकार म्हणून लोकांसमोर येत आहे. हिंदी दिग्दर्शक गोविंद निहालानी दिग्दर्शित ‘ती आणि इतर’ या सिनेमासाठी ‘शफक’ या टोपण नावाने त्यांनी गझल लिहिली आहे. ‘बादल जो घीर के आये’ असे या गझलचे उर्दू बोल असून संगीतकार वसुदा शर्मा दिग्दर्शित ही गझल अदिती पॉल यांनी गायले आहे.

सिनेमातील या गझलमुळे सचिन यांना गझल कवी शफक अशी देखील ओळख लवकरच मिळणार आहे. तसेच या सिनेमात मंदार चोळकर लिखित आणि वसुदा शर्मा संगीत दिग्दर्शित ‘आतुर मन’ हे गाणेदेखील यात असणार आहे. गायिका अंकिता जोशीचा आवाज लाभलेले हे गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरणार आहे.

सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन… (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा ‘ती आणि इतर’ हा सिनेमा 21 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्त्राr समस्येवर भाष्य करणाऱया या चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. हिमांशू ठाकूर प्रस्तुत या चित्रपटाची प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहलानी आणि धनंजय सिंह यांनी निर्मिती केली असून मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्ा्रजी नाटक ‘लाईटस् आऊटवर’ हा सिनेमा आधारित आहे. तसेच प्रसिद्ध स्त्राrवादी विचारधारेतील लेखिका शांता गोखले यांनी या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिली आहे. या सिनेमात अमफता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल आणि गणेश यादव हे कलाकार देखील पहायला मिळणार आहेत.

Related posts: