|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आई वडीलांच्या प्रेमातुन उतराई

आई वडीलांच्या प्रेमातुन उतराई 

प्रतिनिधी/ दहिवडी

आई वडीलांच्या प्रेमातुन उतराई होण्यासाठी माणदेशातील स्वरुपखानवाडी ता माण येतील विजय खराडे या युवकाने आपल्या अल्पशिक्षीत असणार्या आई वडीलाना अमेरीका फिरायला नेहल असल्यान  परिसरात सगळीकडे कौतुकाचा विषय झाला आहे  दुष्काळी माण तालुक्यातील स्वरुपखानवाडी हे एक छोटस गाव पाण्याची परिस्तिती बेताचीच आहे त्यामुळे गावातील अनेक जण आपल्या पोटापाण्यासाठी मजुरीच करतात तर काही जण मेंढपाळ हा आपला पारंपारीक व्ययसाय करतात याच गावातील भिवाजी आणि राधाबाई खराडे हे दांपत्य अगदी अल्प शिक्षीत शाळेची अजिबात ओळख सुध्दा नाही.आपल्याला जमीन कमी असल्यान आणि पाण्याची कमरता यामुळे ते ही आपल्या उदर निर्वाहासाठी मेंढपाळी करु लागले या व्यवसायात गावोगावी फिराव लागत होत कालांतराने त्याना एक मुलगा झाला त्याच तानाजी नाव ठेवल त्यानतर दुसरी मुलगी झाली आणि तीसरा मुलगा झाला त्याच नाव विजय ठेवल आता मात्र त्याना मेंढपाळ म्हणुन काम करणे अवघड झाल या मुलाना घेवुन जाने त्याना शक्य होत नव्हत मुल मोठी होवु लागली होती तिन्ही मुल बुध्दीन तल्लख असल्यान त्याना शाळेत घालण घरजेच वाटु लागल स्वता अशिक्षीत असुन सुध्दा त्यानी त्याना शाळेत घातल मग त्यांचा सांभाळ करायच म्हणुन हे दोघे ही पती पत्नी गावातच मजुरी करु लागले कोणाच्या शेतात मोल मजुरी करायची तर कधी बांधकामावर बिगारी म्हणुन कामाला जायच कोणत्याही कामात त्यानी कधी कमी पणा वाटुन घेतला नाही.मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या भिवाजी आणि राधाबाई यानी सतत काबाडकष्टा शिवाय काय केल नाही मुलाना स्वरुखानवाडीतच जिल्हा परिषद शाळेत घातलेल सगळी मुल अभ्यासात हुशार असल्यान त्याना हि मजुरीच काय वाटत नव्हत.अनेक वेळा पुस्तक पाटी वही पेन शाळेची फी भरायला पैसे नसायचे दोन खणांच घर त्यात ही घरात लाईटची सोय पण नव्हती अशा परिस्तीतीत मुल शिकत होती घरात दिव्यावर अभ्यास करायचे त्यामुळे आई वडीलानी कुणाकडुन हि हात उसने घ्यायचे पण शिक्षणात कधी खंड पडु द्यायचा नाही असा पण केला होता त्यानतर तानाजी आणि विजय यानी महिमानगड मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत प्रवेश घेतला त्या ठिकाणी हि दोघानी आपली गुणवत्ता दाखवुन दिली त्यानंतर दहिवडी महाविद्यालयात प्रवेशघेतला.महाविध्यालयीन शिक्षण घेत त्यानी पुणे गाठल पुण्यात शिक्षण घेवुन तानाजी यानी आपल्या आई वडीलांचे कष्टाचे चीज करत मुंबईत प्राध्यापक म्हणुन नोकरी मिळवली त्यावेळी आई वडीलांचा आनंद गगणात मावत नव्हता त्यानंतर विजय सुध्दा पुण्यात सायन्स साईडने एम एस सी फिजिक्स करत होता ते पुर्ण करुन तो अभियंता झाला आणि खुप गरीबीतुन शिक्षण घेतल्यान त्याना परिस्तीची जाणीव होती आपल्या आई वडीलानी केलेले कष्ट त्यानी डोळ्यानी पाहिल होत म्हणुन प्रत्येक गोष्टीत ते हिम्मत ठेवुन होते यातच त्याना अमेरीका येतील शिकागो मध्ये जॉब मिळाला.माणदेशातील स्वरुपखानवाडी ते अमेरीका हा प्रवास खुप जिद्दीन आणि आई वडीलांच्या कष्टान पुर्ण केला होता प्रत्येक गोष्टीत त्यानी आई वडीलाचे कष्ट पाहिल्यान त्यानी कधीच हिम्मत न हारता पुर्वीचे दिवस बदलायच ठरवल त्याला यश आल तो अमेरीकेला गेला पण ज्यानी आपल्याला खुप हालाकीत राहुन शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले त्या आई वडीलाना सुध्दा आपण सुखाचे दिवस पहायला अमेरीकेला न्यायच हा विचार सारखा घोळत होता.आई वडील कधी सातारा जिह्याच्या बाहेर फिरायला हि गेले नव्हते गेले तर कोणाच्या तरी लग्नाला किंवा पै पाहुण्याच्या दुखत कार्यक्रमाला येवढाच काय तो त्यांचा प्रवास झाला होता दोघे ही अल्प शिक्षीत शाळा म्हणजे काय ते माहित नव्हत नावालाआणि दाखला मिळवण्या पुर्ती शाळा.साधी सही करायची बोंबाबोंब होती त्याना अमेरीकेला घेवुन जाण्याचा निर्णय विजय ने घेतलेला पण त्यांच्या कागद पत्राचे सोपस्कर पुर्ण करणे गरजेचे होते मात्र ज्याच्या दैवात जी गोष्ट असते ती कशी ही पुर्ण होते याची साक्ष जणु पहायला मिळाली जी कागदपत्र लागणार होती ती मिळवण्याची धडपड सोसायटीचे चेअरमन सचिन कदम आणि विजय यानी केली त्या धडपडीला अखेर यश आल आणि भिवाजी अन राधाबाईना अमेरीकेला जायला व्हीसा मिळाला कधी ही प्रवास न केलेले हे दोघेजण अमेरीकेला एकटे जाणार होते याचे ज्यास्त अपृप होते अगदी साधी सफारी परिधान केली होती हातात साधी पिशवी आणि राधाबाईनी हिरवी नववारी साडी आणि कपाळाला ठसठशीत कुंकु लावल होत अगदी मराठ मोळ रुप उठुन दिसत होत त्या चकचकीत विमान तळावर हे सगळ त्याना अगदी नव नव होत दररोज माणच्या माळ रानावरील काळी माती आणि तीव्र उन्हाची सवय झालेल्या या पती पत्नीला विमान तळावरील ऐसी वातावरण लय वेगळ वेगळ होत याना त्यानुसार गेले दोन दिवसापुर्वी ते पुण्या पर्यंत गेले तिथुन दिल्ली आणि पुढे अमेरीका असा दोघानीच प्रवास केला प्रत्येक ठिकाणी मुलगा विजय याने त्याना विमानात बसवण्याची खास ज्यादा चार्जेस देवुन सोय केली होती त्यामुळे दोघाना प्रवास करता आला अमेरीकेत पोहचल्यावर आपल्या आई वडीलाना पाहताच विजयच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले  आणि वडीलांच्या आईच्या नतमस्तक होवुन पाया पडला हे अमेरीकेतील विमानतळावरील एक्झीकेटीव्ह लोकाना नवीन होत पण ते सत्य होत 

त्यामुळे आई वडीलांच्या कष्टातुन उतराई झाल्याची भावना विजयने व्यक्त केली 

Related posts: