|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळली ; 16 भाविकांचा मृत्यू

अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळली ; 16 भाविकांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱया भाविकांच्या बसला अपघात झाला असून, ही बस खोल दरीत कोसळली. यामध्ये 16 भाविकांचा मृत्यू झाला असून, 29 जण जखमी झाले आहेत. हा अपघात जम्मूच्या बनिहाल येथे झाला.

अमरनाथ यात्रेसाठी देशातील विविध भागातून भाविक येत असतात. जम्मू-श्रीनगर महामार्गावर रायबन येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱया भाविकांच्या बसला आज अपघात झाला. भाविकांनी भरलेली ही बस खोल दरीत कोसळली. यामध्ये 16 भाविकांच्या मृत्यू झाला असून, 29 यात्रेकरु जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज ही घटना घडली आहे.