|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्यांनाचा कर्जमाफी : मुख्यमंत्री

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्यांनाचा कर्जमाफी : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱयांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगत सरसकट कर्जमाफीबाबत आपली भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कर्जमाफीनंतर नव्याने पीक कर्ज घेण्याऱयांसाठी सवलतीच्या दरात ते उपलब्ध करुन देऊ असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 15 जिह्यात चार हजार कोटीचा प्रकल्प उभारणार असल्याचेही ते म्हणाले.

Related posts: