|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » क्रिडा » रवी शास्त्रींचे मानधन 7 कोटी?

रवी शास्त्रींचे मानधन 7 कोटी? 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वार्षिक 7 ते 7.5 कोटी रुपये मानधन दिले जाण्याची शक्मयता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

‘बीसीसीआय शास्त्रींना 7 कोटीहून अधिक रुपयांची ऑफर देणार आहे. मात्र ही रक्कम 7.5 कोटीहून अधिक असणार नाही. गेल्या मेमध्ये माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मानधनाबाबत प्रेझेंटशन सादर केले त्यावेळी याच रकमेची मागणी केली होती,’ असे एका वरि÷ पदाधिकाऱयाने सांगितले. शास्त्रींना संघाचे संचालक म्हणून कार्यरत असतानाही 7 ते 7.5 कोटीचे पॅकेज देण्यात आले होते. यात समालोचनाचे काम बंद करावे लागल्याने होणाऱया नुकसानीचाही समावेश होता. त्यांचे साहाय्यक म्हणून काम करणाऱया स्टाफला 2 कोटींहून अधिक मानधन मिळणार नाही. ‘फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांना 2 कोटीपेक्षा अधिक रक्कम दिली जाणार नाही. मंडळ या सर्वांचे मानधन निश्चित करण्याच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहे,’ असेही या पदाधिकाऱयाने सांगितले.

साहाय्यक स्टाफसाठी सदर मानधन निश्चित झाल्यास त्यांच्या मानधनातील ती भरीव वाढ असेल. संजय बांगर व शास्त्रींच्या पसंतीच्या भरत अरुण यांना निवडले गेल्यास त्यांना हे भरीव मानधन मिळू शकते. ‘बांगरने आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे पद सोडले होते आणि अरुणची निवड झाल्यास त्याला आरसीबी व हैदराबाद रणजी संघातील पद सोडावे लागणार आहे,’ असेही या सूत्राने सांगितले. भारत अ व 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱया राहुल द्रविडला पहिल्या वर्षासाठी 4.5 तर दुसऱया वर्षासाठी 5 कोटी रुपये मानधन दिले जाईल. विदेश दौऱयात त्याची खास सल्लागारपदी निवड झाली असल्याने त्याचे वेगळे मानधनही त्याला मिळणार आहे. झहीर खानच्या स्टेटसबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने त्याच्याबाबत मंडळाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. गेल्या वषी झहीरने 100 दिवसांसाठी 4 कोटीची मागणी केली होती, जी मंडळाने फेटाळून लावली होती, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

Related posts: