|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » क्रिडा » माकारोव्हा-व्हेस्निना अजिंक्मय

माकारोव्हा-व्हेस्निना अजिंक्मय 

विम्बल्डन ग्रँडस्लॅम :  पुरुष दुहेरीत क्युबोट-मार्सेलोची बाजी

वृत्तसंस्था/ लंडन

रशियाच्या एकतेरिना माकारोव्हा व एलेना व्हेस्निना यांनी विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पहिल्यांदाच पटकावले तर पुरुष दुहेरीत पोलंडचा लुकास क्मयुबोट व ब्राझीलचा मार्सेलो मेलो यांनी अजिंक्मयपद पटकावले.

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात माकारोव्हा-व्हेस्निना यांनी तैवानची हाओ चिंग चॅन व रोमानियाची मोनिका निकुलेस्क्मयू यांचा 6-0, 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित या स्पर्धेचे पहिले अजिंक्मयपद पटकावले. त्यांना या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले होते. या रशियन जोडीच्या नावावर आता तीन ग्रँडस्लॅम अजिंक्मयपदाची नोंद झाली असून 2013 मध्ये त्यांनी फ्रेंच ओपन व 2014 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. 2015 मध्ये या जोडीला येथे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. येथील अंतिम लढत केवळ 54 मिनिटांत संपली. या सामन्यात विजेत्या जोडीला फक्त दोन ब्रेकपॉईंट्स वाचवावे लागले. अग्रमानांकन मिळालेल्या अमेरिकेच्या बेथनी मॅटेक सँड्स व झेकच्या लुसी सफारोव्हा यांना महिला दुहेरीच्या दुसऱया फेरीआधीच माघार घ्यावी लागली. एकेरीचा सामना खेळताना बेथनीला घोटय़ाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला होता.

क्युबोट-मेलो विजेते

‘मॅरेथॉन मेन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया पोलंडचा लुकास क्मयुबोट व ब्राझीलचा मार्सेलो मेलो यांनी पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविताना आस्ट्रियाचा ऑलिव्हर माराच व क्रोएशियाचा मेट पॅव्हिक या जोडीचा चुरशीच्या लढतीत 5-7, 7-5, 7-6 (7-2), 3-6, 13-11 असा पराभव केला. शेवटच्या सेटवेळी 11-11 वर असताना अंधुक प्रकाश झाल्याने हा सामना सरकत्या छताची सोय असलेल्या सेंटर कोर्टवर प्रकाशझोतात पूर्ण करण्यात आला. थंडी जाणवू लागल्याने माराच-क्युबोट यांना पुन्हा खेळ सुरू झाल्यावर पहिल्याच सर्व्हिस गेममध्ये भेदले गेले आणि विजयी जोडीने कोर्टवर पडून जल्लोष सुरू केला. ही मॅरेथॉन लढत तब्बल 4 तास 39 मिनिटे रंगली होती. दोन्ही जोडय़ा उपांत्य फेरीत पाच सेट्सच्या झुंजीत विजय मिळवूनच अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. माराच-पॅव्हिक यांनी उपांत्य लढतीत क्रोएशियाच्या निकोला मेक्टिक व फ्रँको स्कुगर यांच्यावर मात करण्यासाठी साडेचार तास घेतले होते. त्यातील शेवटचा सेट त्यांनी 17-15 असा जिंकला होता.

Related posts: