|Sunday, June 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काजिर्णे बंधाऱयातील साठलेल्या पाण्याचे गंगापूजन उत्साहात

काजिर्णे बंधाऱयातील साठलेल्या पाण्याचे गंगापूजन उत्साहात 

प्रतिनिधी/ चंदगड

काजिर्णे लघुपाटबंधारे साठवण तलावात यावर्षी प्रथमच पाणी साठवण्यात आले असून रविवार अखेर 50 टक्के पाणीसाठा झाला असून या तलावाचेही गंगापूजन तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील यांच्या हस्ते झाले.

काजिर्णे साठवण तलाव 173 एमसीएफटी क्षमतेचा असून या तलावाचे काम 1999 साली सुरू झाले होते. चंदगड तालुक्यातील सर्वाधिक 18 वर्षे रखडलेला हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम कधी निधी नाही म्हणून तर कधी बांध खचला म्हणून रेंगाळले होते. नरसिंगराव पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा प्रकल्प तांत्रिक अडचणीमुळे पुढे आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी साठवण तलावात रूपांतरीत केला. तरीही रखडलेला प्रकल्प यावर्षी होण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. नरसिंगराव पाटील यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प मार्गी लागला म्हणून त्यांचे चिरंजीव राजेश पाटील यांच्या हस्ते गंगापूजन झाले. राजेश पाटील म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून नरसिंगराव पाटील यांनी अथक प्रयत्न केले होते. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱयांच्या जमिनी गेल्या. ज्या अधिकाऱयांनी अथक परिश्रम घेतले. ज्यांनी हा प्रकल्प व्हावा म्हणून पाठपुरावा केला. त्या सर्वांमुळेच आज पाणीपूजनाचा योग आला आहे. सध्या प्रकल्प 50 टक्के भरलेला असला तरी तो साहेबांच्या प्रथम स्मृतीदिनापर्यंत म्हणजे 9 ऑगस्ट पर्यंत हा तलाव पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा आहे. यावेळी मल्लिकार्जुन वाटंगी, सदानंद आवटे, शिवानंद हुंबरवाडी, भिकू गावडे, नामदेव दळवी, जि.प.सदस्य अरूण सुतार, बाळासाहेब घोटगे, परसू पाटील, राजाराम पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

Related posts: