|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला 

प्रतिनिधी/ चंदगड

ताम्रपर्णी नदीवरील जांबरे मध्यम प्रकल्प शनिवारी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. गेल्यावर्षी हा प्रकल्प 12 जुलै रोजी भरला होता. यावर्षी तीन दिवस उशिराने भरला असून जांबरे मध्यम प्रकल्पातील साठलेल्या पाण्याचे गंगापूजन चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जांबरे मध्यम प्रकल्प एक टी.एम.सी. क्षमतेचा असून यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. स्व. नरसिंगराव पाटील यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे स्व. नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांच्याच हस्ते गंगापूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेवराव दळवी, जिल्हा परिषद सदस्य अरूण सुतार, परसू पाटील, शिवानंद हुंबरवाडी, मल्लिकार्जुन वाटंगी, भिकू गावडे, अरूण काणेकर, बाळासाहेब घोडके, सदानंद आवटे, राजाराम पाटील, विनोद पाटील आदींची उपस्थिती होती.

Related posts: