|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जूना दगडी पूल झाला पार्किंगचे ठिकाण

जूना दगडी पूल झाला पार्किंगचे ठिकाण 

पंढरपूर / वार्ताहार

      येथील काही दिवसापूर्वी वाहतूकीस बंद करण्यात आलेला पूल म्हणजेच जूना दगडी पूल या पूलास 150 वर्षाची परंपरा लाभली असून ब्रिटिश कालीन असलेला हा आता वापरा अभावी पडून आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्रशासनाने जून्या दगडी पूला शेजारी जागा संपादन करून एक पूल उभारला हा पूल तयार होण्यापूर्वीच नगरपालिका प्रशासनास इंग्लंड सरकारकडून एक पत्र प्राप्त झाले ज्यामध्ये या पूलाचे आयूष्यमान संपल्याचे सांगण्यात आले होते.

    यामूळे तातडीने नगरपालिका प्रशासनाने याकामास गती देउन जून्या दगडी पूला शेजारीच एक मोठा व उंच असा पूलाची उभरणी केली. वास्तविक पाहता जूना दगडी पूलाचे आयूष्य संपल्याचे इंग्लंड कडून कळवल्याचे पत्र जरी पालिकेस  प्राप्त झाले असले तरी जुन्या दगडी पुलांची अवस्था पाहता. त्यांचे आयुष्यमान आणखी काही वर्षे असल्यांचे जाणकारांचे मत आहे. 

तरी या पूलांचा वापर हा वाहतुकीकरिंता होणे अपेक्षित आहे. मात्र नविन पुलामुळे हा पूल केवळ दुचाकी आणि हलक्यां वाहनासाठी तसेच पादचारीसाठी ठेवण्यात आलेला आहे. मात्र या पुलाच्या प्रवेशाजवळ बॅरिंगेटींग केल्याने याठिकाणी दुचाकी देखिल जाताना दिसत नाही. अशा स्थितीमधे येथे चारचाकी वाहने जाउन खुशाल वाहने पार्क करीत असताना दिसत आहेत.

   विशेष म्हणजे अंबाबाई पटांगणामधे पालिकेचे सुसज्ज असे पार्कीगचे मैदान आहे. तरी देखिल याठिकाणी कुठलेही वाहन पार्कीग केलेले दिसून येत नाही. वारीमधेच हे पार्कीग हाउसफ्gढल्ल भरलेले असतात.

   या सर्वामधे पाहीले तर वाहतुक शाखेचे पोलिस जुन्या दगडी पुलावंरच जाउन बेशिस्त वाहनांवर कावाई करतात. मात्र येथे पार्क केलेल्या वाहनांना कधी वाहनतळांवर आपले वाहन पार्क का केले नाही ? यांची जाणिव करून देतात का ? हा संशोधनाचा विषय आहे.

   वास्तविक पाहीले तर पूर्वी अनेक वाहने हे थेट वाळवंटामधे वाहने पार्कीग करीत होते. सध्या उच्च न्यायालयांच्या नियमानुसार येथे वाळवंटामधे वाहने नेण्यास मज्जाव आहे. तरी देखिल काही वाहने अनेक वेळा वाळवंटामधे प्रवेश करतात. कदाचित पूर्वीच्याच वाळवंटात पार्कीग असलेल्या समजुतीने सदरचे परगावहून येणारी भाविकांची वाहने थेट वाळवंटामधे जातात का ? असा सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे. आणि अस जर असेल. तर याठिकाणी निश्चितच पार्कीगच्या स्थळांच्या माहीतीचे फ्ढलक लावण्यांची गरज आहे.

Related posts: