|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विश्रामबागमध्ये घरफोडी

विश्रामबागमध्ये घरफोडी 

प्रतिनिधी/ सांगली

विश्रामबाग परिसरातील आश्रय सोसायटीमधील बंद फ्लॅट फोडून चोरटयांनी सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून विश्रामबाग पोलीसात याची नोंद झाली आहे.

 आश्रय सोसायटीमध्ये असणाऱया संस्कार अपार्टमेंटमध्ये किरण संपतराव सूर्यवंशी यांचा फ्लॅट आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांसह ते बाहेर गेले होते. साडेतीन वाजता परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लोखंडी दरवाजाच्या ग्रील तोडून चोरटय़ांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता. कपाटातील सोन्याचे तीन तोळयांचे गंठण, कर्णफुल, दोन साखळया, तीन बदाम, चांदीच्या दोन समई असा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे. रात्री उशीरा विश्रामबाग पोलिसात याची नोंद झाली आहे.

Related posts: