|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नीरा देवघर पाणीप्रश्नी रास्ता रोको

नीरा देवघर पाणीप्रश्नी रास्ता रोको 

शहर प्रतिनिधी/ फलटण

हक्काच्या नीरा देवघरच्या पाण्यासाठी नीरा देवघर संघर्ष समितीच्यावतीने रविवारी शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे युवा नेते रणजीतसिंह नाईक- निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलन सुरु करताच काही वेळातच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

   नीरा देवघरच्या पाणी प्रश्नी माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली काही दिवस जनजागृती सुरु आहे. आंदोलनाचा भाग म्हणून लाभक्षेत्रातील शेतकऱयांनी फलटण येथे नुकताच भव्य मोर्चा काढला होता. आंदोलनाचा पुढील भाग म्हणून रविवारी माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडे अकराच्या सुमारास क्रातिसिंह नाना पाटील चौक येथे रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ झाला. सदर आंदोलनात युवक नेतृत्व दिगंबर आगवणे, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. नरसिंह निकम, नगरसेवक सचिन अहिवळे, काँग्रेसचे गटनेते अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, रणजीत जाधव, शरद झेंडे, अमरसिंह निंबाळकर, प्रल्हाद भोईटे, राजू नागटिळे आदींची उपस्थिती होती. रास्तारोको आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर आंदोलकांना पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी सदर आंदोलन करण्यात येवू नये याबाबत नोटीस देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, तरीही आंदोलकांनी आंदोलन सुरु केल्याने नीरा देवघर संघर्ष समितीचे सदस्य व राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱयांना बिपी ऍक्ट 68 प्रमाणे ताब्यात घेण्यात आले व समज आणि ताकीद देऊन सोडण्यात आले. 

 आंदोलन की खोडसाळपणा..!

रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर रविवारी  पुणे-पंढरपूर मार्गावरील निंभोरे व पिंप्रद येथे रविवारी सकाळीच रस्त्यावर दगड टाकून रस्ते अडविण्यात आल्याची चर्चा या परिसरात होती. परंतू हे काम नेमके कुणी केले असावे, हे स्पष्ट न झाल्याने हा प्रकार म्हणजे आंदोलन की खोडसाळपणा, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.

Related posts: