|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात डासप्रतिबंधक औषध फवारणी

शहरात डासप्रतिबंधक औषध फवारणी 

प्रतिनिधी / बेळगाव

शहरात रोगराईचा फैलाव वाढला असून महापालिका प्रशासन सुस्तच आहे. यामुळे शनिवारी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. रोगराईचा फैलाव होऊ नये याकरिता आवश्यक उपाययोजना राबवून डासप्रतिबंधक औषध फवारणी करण्याचा आदेश देण्यात आला होता. याची दखल घेऊन रविवारपासून शहरात डासप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली.

दीड महिन्यात शहरातील 8 लोकांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शनिवारी महापालिका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. औषध फवारणी करण्याची मागणी करूनही याकडे का दुर्लक्ष करण्यात आले, याचा जाब अधिकाऱयांना विचारण्यात आला. सध्या डासांचा उपद्रव वाढला असल्याने प्रथम फॉगिंग मशीनद्वारा औषध फवारणी करावी, असा आदेश स्थायी समिती अध्यक्ष राजू बिर्जे यांनी दिला होता. यामुळे महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले असून रविवारी सुटीचा दिवस असूनही महापालिकेच्यावतीने शहरातील विविध भागात फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी करण्यात आली.     

Related posts: