|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गांजापाठोपाठ आता ब्राऊन शुगरचीही विक्री

गांजापाठोपाठ आता ब्राऊन शुगरचीही विक्री 

तिघा जणांना अटक, 50 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त, एपीएमसी पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

शहर व उपनगरात गांजाची विक्री जोरात सुरू असतानाच आता ब्राऊन शुगर विकणाऱया एका त्रिकुटाला रविवारी एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 50 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास केएलई इस्पितळाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट, उपायुक्त सीमा लाटकर, अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी त्रिकुटाला अटक केली आहे.

फहीम अफसर मेस्त्राr (वय 22, रा. बसव कॉलनी), रविकिरण बसवनगौडा पाटील (वय 20, रा. वीरभद्रनगर), अब्दुल्ला अश्पाक जमादार (वय 19, रा. रामनगर, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या ब्राऊन शुगरची किमत सुमारे 45 हजार रुपये आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

केएलई इस्पितळाजवळ ब्राऊन शुगरची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून या त्रिकुटाला अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 50 ग्रॅम ब्राऊन शुगर आढळून आली. हा साठा त्यांनी कोठून आणला याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली. विद्यार्थ्यांना डोळय़ासमोर ठेवून, गांजा, ब्राऊन शुगर, मरिजुआना, हाशिश, आफिम विक्री करण्यात येत आहे. जादा प्रमाणात गांजाची विक्री होते. गेल्या पंधरवडय़ात 15 हून अधिक गांजा विकणाऱयांची धरपकड करण्यात आली आहे. आता ब्राऊन शुगर विकणाऱयांना अटक झाली आहे.   

 

Related posts: