|Thursday, July 27, 2017
You are here: Home » Top News » अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंगअभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दिवगंत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला.मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने थिएटरमध्ये विनयभंग केल्याची माहिती प्रिया बेर्डे यांनी दिली.

मीरा रोडमधील थिएटरमध्ये हा प्रकार घडला. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या.सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पालिसांच्या ताब्यात दिल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. या प्रकरणी बोरवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनील जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे.काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपीविरोधात भारतीय दंडविधान कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!