|Sunday, June 17, 2018
You are here: Home » Top News » संसदेच्या पावसाळी आधिवेशनाला सुरूवात

संसदेच्या पावसाळी आधिवेशनाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला सुरूवात झाली असून अधिवेशनाच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांच्या खासदारांना ‘जीएसटी’विषयी माहिती दिली. जिएसटी म्हणजे ‘ग्रोविंग स्टाँगर टुगेदर’ असे सांगत मोदींनी विरोधी पक्षांना सहकार्याचे अवाहन दिले.

स्वयंघोषित गोरक्षकांचा हिंसाचार, शेतकरी आंदोलन, काश्मीरमधील तणाव, अमरनाथ यात्रेवरील हल्ला, चीनची घुसखोरी आदी मुद्यांवरून विरोधक पावसाळी अधिवेशनात संसदेत सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, पावसळय़ात शेतकरी मेहनत करून देशाची भूक भागवतात. या शेतकऱयांना मी नमन करतो असे मोदींनी सांगितले.

 

Related posts: