|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » 776 खासदार, 4120 आमदार मिळून निवडतात भारताचा राष्ट्रपती

776 खासदार, 4120 आमदार मिळून निवडतात भारताचा राष्ट्रपती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताच्या 14व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान झाले. 776 खासदार आणि 4120 आमदार मिळून राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात. रामनाथ कोविंद आणि मीरा कुमार यांच्यामध्ये लढत पहायला मिळणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून संसदेसह विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान सुरू आहे.

राम नाथ कोविंद हे देशाचे 14वे राष्ट्रपती होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 20 जुलैला नव्या राष्ट्रपतीचे घोषणा होणार आहे.आज सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. मतदानाआधी मोदींनी माध्यमांशी संवाद साधले. आगामी पावसाळी अधिवेशनाने देशाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडण्याची संधी दिली आहे.

 

Related posts: