|Sunday, June 17, 2018
You are here: Home » उद्योग » एनएसई सीईओपदी विक्रम लिमये

एनएसई सीईओपदी विक्रम लिमये 

वृत्तसंस्था/ मुंबई

विक्रम लिमये यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओपदाची सोमवारी जबाबदारी स्वीकारली. एनएसईमधील नियामकासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडविणे आणि आयपीओ प्रक्रियेला विनाविलंब सुरू करण्यास प्राधान्य असेल. सेबीकडून जारी करण्यात आलेल्या नियमांना पहिल्यांदा स्थान देत ते काटेकोरपणे पाळण्यात येतील. हिस्सेदार, नियामक, सरकार आणि प्रसारमाध्यमांबरोबरचे संबंध सुधारण्यात येतील असे त्यांनी म्हटले. एनएसईमध्ये काही लोकांनी हस्तक्षेप करत निवडक गुंतवणूकदारांना फायदा पोहोचविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

लिमये यांच्या नावाची घोषणा पाच महिन्यापूर्वी झाली होती. मात्र या पाच महिन्यात एनएसईमधील समस्यांत वाढ झाली आहे. सेबीचे नवीन अध्यक्ष अजय त्यागी यांनी एनएसई आणि 14 अधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. गेल्या आठवडय़ात बाजार तब्बल 3 तास बंद होता. गेल्या डिसेंबरमध्ये आयपीओसाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र सेबीने पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे.

Related posts: