|Sunday, June 17, 2018
You are here: Home » उद्योग » रिलायन्सचे बाजारमूल्य 5 लाख कोटीवर

रिलायन्सचे बाजारमूल्य 5 लाख कोटीवर 

वृत्तसंस्था / मुंबई

रिलायन्स इन्डस्ट्रीज लिमिटेडचे बाजारमूल्य सोमवारी 5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या टेडिंग इतिहासात पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे. सोमवारी कंपनीचा समभाग वर्षाच्या उच्चंकावर पोहोचला. दिवसअखेरीस कंपनीचे बाजारमूल्य 5.04 लाख कोटीवर पोहोचले. देशातील पाच लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असणारे रिलायन्स ही दुसरी कंपनी बनली आहे.

जुलैमध्ये आतापर्यंत कंपनीच्या समभागात 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचा समभाग 41 टक्क्यांनी वधारला आहे. 11 जुलैला जिओसाठी कंपनीने नवीन दराची घोषणा केली होती. या नवीन दराने प्रत्येक ग्राहकाकडून मिळणाऱया उत्पन्नावर लक्ष देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. जिओमुळे उत्पन्नात वाढ होणार असल्याने त्याचे सकारात्मक संकेत समभागावर दिसून आले. या आठवडय़ात कंपनीच्या दुसऱया तिमाहीचे निकाल जारी करण्यात येणार आहेत. 20 जुलैला कंपनी जून तिमाहीचा निकाल प्रसिद्ध करेल.

5 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य गाठणारी रिलायन्स इन्डस्ट्रीज ही दुसरी कंपनी आहे. यापूर्वी 23 जुलै 2014 रोजी टीसीएसचे बाजारमूल्य या पातळीवर गेले होते. मात्र समभागात घसरण झाल्याने बाजारमूल्य घसरले. आता टीसीएसचे बाजारमूल्य 4.61 लाख कोटी आहे. वर्षभरापूर्वी टीसीएसचे बाजारमूल्य 5.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.

Related posts: