|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » यंदा 468 मि.मी.च्या सरासरीने पाऊस पिछाडीवर

यंदा 468 मि.मी.च्या सरासरीने पाऊस पिछाडीवर 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ात 17 जुलै अखेरपर्यंत 1402.46 मि. मी. च्या सरासरीने एकूण 11,219.76 मि. मी. पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस पिछाडीवर पडला आहे. गतवर्षी 17 जुलै अखेरपर्यंत 1871.10 मि.मी. च्या सरासरीने एकूण 14,968.8 मि. मी. पाऊस पडला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 468.64 मि. मी. सरासरी व 3,748.32 मि. मी. एवढा एकूण पाऊस यावर्षी कमी पडला आहे.

  जिल्हय़ात गतवर्षी चांगलाच पाऊस पडला होता. संपूर्ण पावसाळी हंगामात सिंधुदुर्गची 3400 मि.मी.ची वार्षिक सरासरी गाठून 4000 मि. मी. सरासरीच्या पुढे पाऊस पडला होता. यावर्षीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, जूनच्या प्रारंभास पाऊस सुरू झाला तरी मुसळधार पाऊस फारच कमी दिवस पडला. गेल्या दीड महिन्यात लहरी पाऊस आणि ऊन पावसाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतीला पूरक असा पाऊस पडत असला तरी गतवर्षीची सरासरी पावसाने गाठलेली नसून पिछाडीवर पडला आहे.

  17 जुलै 2016 अखेरपर्यंत गतवर्षी 1871.10 मि. मी. च्या सरासरीने विक्रमी 14,968.08 मि. मी. एवढा पाऊस पडला होता. गतवर्षी पाऊस सुसाट कोसळत होता. मात्र, यावर्षी लहरी पावसामुळे मागे पडली आहे. यावर्षी 468.64 मि. मी. च्या सरासरीने 3,748.32 एवढा एकूण पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे आतापर्यंत 1402.46 मि. मी. च्या सरासरीनेच एकूण 11,219.76 मि. मी. पाऊस पडला आहे.

  आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता सर्वाधिक कणकवली तालुक्यात एकूण 1759 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वात कमी देवगड तालुक्यात 1,080 मि. मी. पाऊस पडला आहे. दोडामार्ग 1632 मि. मी., सावंतवाडी 1616.8 मि. मी. पाऊस, वेंगुर्ला 1327.56 मि. मी., कुडाळ 1325 मि. मी., मालवण 1133.4 मि. मी., वैभववाडी 1346 मि. मी. याप्रमाणे तालुकानिहाय एकूण पाऊस झाला आहे.