|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विविध संघटनांनी चायना वस्तू केल्या भस्मसात

विविध संघटनांनी चायना वस्तू केल्या भस्मसात 

प्रतिनिधी/ सातारा

मेड इन चायनाला भारतातून हद्दपार करा, चायना वस्तूंचा निषेध अशा घोषणा देत, रिपाइं, हेरंब प्रतिष्ठान, मातोश्री प्रतिष्ठान आदी विविध संस्था, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर चायना वस्तूंची होळी केली. तसेच यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात रिपाइं युथचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वायदेंडे, हेरंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नाना इंदलकर, मैत्री प्रतिष्ठानचे हर्षल चिकणे, मातंग आघाडीचे संपत भिसे, शुक्राचार्य भिसे, आप्पा तुपे, साईनाथ खंडागळे, अक्षय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनने आपल्या देशांशी असलेले मैत्रीच्या संबंधात सीमा वाद निर्माण करून आपल्या पाठीत खंजिर खुपसला आहे. आतापर्यंत भारत देशाने मागील वादावर पडदा टाकून मैत्रीचे संबंध प्रस्थपित करून आपला देश आणि चीन यांच्यामध्ये आर्थिक दृष्टय़ा सक्षमता होण्यासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली आपल्या देशामध्ये त्यांना आपण त्यांची लाखो उत्पादने विक्रीस बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोलाचा वाटा उचलला असून करोडो, अब्जो भारतीय चलन त्यांना मिळू लागले. जगात सर्वात जास्त लोकसंख्या मोठी असून त्यांच्या देशास सक्षम बनविण्यास भारत देशाने त्यांना मदत केली. परंतु आज आपण आपल्याच मिळवून दिलेल्या आपण खरेदी केलेल्या वस्तूंमधून जो फायदा चीन देशाला मिळाला. आज त्याच पैशातून चीन सरकार आपल्या बरोबर युद्ध सामुग्रीचा वापर करून आपल्याच बंधुभगिनींना आपल्या देशाच्या जवानांना मारण्यासाठी वापर करणार आहे. आता खरी वेळ आली आहे. देशाबद्दल स्वाभिमान दाखवण्याचा देशाबद्दल असलेले प्रेम आस्था दाखवण्याची हीच वेळ आहे. प्रबोधनाची आपण भारतीय नागरिकांनी शपथ घेऊन चायना वस्तूचा वापर टाळण्याची एखादी वस्तू महाग असली तरी चायना वस्तू सोडून भारतीय बनावटीच्या वस्तू घेवूयात देश स्वाभिमान बाळगू या, तरच आपण सक्षम भारत देश घडवू, अशी विनंती करण्यात आली आहे.