|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » मला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती

मला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रितसर लग्न करायचे आहे, त्यासाठी जामीन अथवा पॅरोलवर सोडा, अशी विनंती 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याने टाडा न्यायालयाला केली.

मागील वर्षी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झाले असल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्यानंतर स्वतः अबू सालेमनेही मुंब्य्रातील कौसर नावाच्या या मुलीसोबत आपले संबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले होते. याचबरोबर आपल्याला त्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्याकरिता परवानगीदेखील अबू सालेमने न्यायालयाकडे केली होती. मात्र, त्यावेळी त्याची विनंती नामंजूर करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा सालेमने न्यायालयाकडे ही विनंती केली.

Related posts: