|Saturday, November 17, 2018
You are here: Home » उद्योग » सेसने आयटीसीच्या समभागाचा काढला धूर

सेसने आयटीसीच्या समभागाचा काढला धूर 

बीएसईचा सेन्सेक्स 364, एनएसईचा निफ्टी 89 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसीच्या समभागात तेजीने घसरण झाल्याने बाजारात विक्री झाली. सरकारने सिगारेटवरील सेस वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आयटीसीच्या समभागात 15 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. रिलायन्स इन्डस्ट्रीजमध्येही घसरण झाली. सेन्सेक्स 1 टक्क्यापेक्षा जास्तने घसरला, तर निफ्टी साधारण एक टक्क्यांपर्यंत घसरत बंद झाला.

दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9,792 आणि सेन्सेक्स 31,626 पर्यंत घसरला होता. दिवसअखेरीस निफ्टी 9,830 आणि सेन्सेक्स 31,700 च्या आसपास बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात ही घसरण झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी घसरला, निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी घसरला.

बीएसईचा सेन्सेक्स 364 अंशाने घसरत 31,711 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 89 अंशाच्या कमजोरीने 9,827 वर स्थिरावला.

एफएमसीजी समभागाव्यतिरिक्त धातू, पीएसयू बँक, स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात विक्री झाली. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 6.75 टक्के, धातू निर्देशांक 0.2 टक्के, पीएसयू बँक निर्देशांक 0.3 टक्क्यांनी घसरले. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 1.1 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.7 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.8 टक्के आणि ऊर्जा समभागात 0.6 टक्क्यांनी घसरण झाली.

आयटी, वाहन आणि औषध कंपन्यांच्या समभागात खरेदी झाली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 0.5 टक्के, वाहन निर्देशांक 0.15 टक्के आणि औषध निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारला. बँक निफ्टी 24,022 वर बंद झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

आयटीसी 12.6 टक्के, अरबिंदो फार्मा 2.3 टक्के, रिलायन्स इन्डस्ट्रीज 2 टक्के, गेल 1.8 टक्के, टाटा पॉवर 1.2 टक्के, एसबीआय 0.8 टक्क्यांनी घसरले. आयशर मोटर्स, एशियन पेन्ट्स, भेल, एचसीएल टेक, ऍक्सिस बँक, झी एन्टरटेनमेन्ट, सन फार्मा, ओएनजीसी 1.9-1.1 टक्क्यांनी वधारले.

Related posts: