|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » लोणावळय़ाजवळ रेल्वे ट्रकवर दरड कोसळली , सिंहगड एक्सप्रेस उशीराने

लोणावळय़ाजवळ रेल्वे ट्रकवर दरड कोसळली , सिंहगड एक्सप्रेस उशीराने 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोणावळयातील मंकी हिलजवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेसचे इंजित रूळावरून घसरल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी डोंगरावरून रेल्वे ट्रकवर दगड कोसळय़ाने या मार्गवरील रेल्वे वाहतूक काही काळ खेळबंली होती. परंतु, रेल्वेतीलच प्रवाशांनी तत्पारता दाखवता ट्रकवरील दगड बाजूला केल्याने येथील वाहतूक सुरळीत झाली. या प्रकारामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी सिंहगड एक्सप्रेस सुमारे 15 मिनिटे उशिराने धावणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरावरील दगड रेल्वे ट्रकवर कोसळले. लोणावळय़ातील मंकी हिल परिसरातुन मुंबई व पुण्याकडे जाणाऱया रेल्वेंचा वेग कमी असल्याने दुर्घटना टळली.ट्रकवर दगड पडल्याचे दिसताच पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या सिंहगड एक्सप्रेसच्या चालकाने गाडी तत्काळ थांबवली. या गाडीतील प्रवाशांनी ट्रकवरील दगड बाजूला करून एक्सप्रेसचा मार्ग मोकळा केला. परंतु, यामुळे एक्सप्रेस सुमारे 15 मिनिटे उशीर झाला.

 

Related posts: