|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तेली समाजातील गुणवंताचा तळेबाजार येथे गुणगौरव

तेली समाजातील गुणवंताचा तळेबाजार येथे गुणगौरव 

तळेबाजार : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने 2017 मधील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच तळेबाजार येथील श्री सिद्धिविनायक हॉलमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, तालुकाध्यक्ष अशोक तेली, उपाध्यक्ष विश्वनाथ खानविलकर, राजेंद्र हिंदळेकर, रवींद्र हिंदळेकर, सौ. प्रीती वाडेकर, पुंडलिक शेटये, मधुकर कुवळेकर, रविकांत तोरसकर, प्रदीप वाडेकर, मनोहर तेली आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. एम. हिंदळेकर यांनी तर आभार विजय शेटये यांनी मानले.

करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

दरम्यान, या कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर फाऊंडेशन व युनिक ऍकॅडमी-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन कार्यशाळाही घेण्यात आली. या शिबिरात तज्ञ सुरेश पाटणकर, संजय कोर्लेकर यांनी विस्तृत स्वरुपात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच इतर संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Related posts: