|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुणालच्या शिल्पकलेची झलक आता यू टय़ूबवर

कुणालच्या शिल्पकलेची झलक आता यू टय़ूबवर 

सिंधुदुर्ग : गुरुकुल पद्धतीने शिल्पकला व शास्त्राrय बासरी वादनाचे शिक्षण घेत खऱयाखुऱया हिंदुस्थानी शैलीचा अभ्यास करणाऱया व अल्पावधीत प्रसिद्धी पावलेल्या कुणाल व धवल या प्रतिभावंत अशा जोशी बंधूंच्या शिल्पकला व शास्त्राrय बासरी वादनाची झलक आता यू टय़ूबच्या माध्यमातून साऱया जगाला होणार आहे. साई जळवी फिल्मस्तर्फे मालवण तालुक्यातील तिरवडे येथील आर्यानगरी परिसरात याचे चित्रिकरण करण्यात आले.

  तिरवडे या गावातील आर्यानगरी या निसर्गरम्य परिसरात कुणालने शिल्पकलेच्या साधनेसाठी स्टुडिओ उभारण्यास सुरुवात केली आहे. या स्टुडिओमध्ये काही दिवसांतच विविध शैलीतील शिल्पकला कृती पाहायला मिळणार आहेत. सिंधुदुर्गातील शिल्पकलेचे हे पहिलेच दालन ठरणार आहे. कुणालच्या कलागुणांची दखल घेत आकाशवाणीवर त्याची नुकतीच मुलाखत प्रसारित करण्यात आली. आता त्याचे शिल्पकौशल्य पाहाण्याची संधी शिल्पप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे. जळवी फिल्मस् निर्मितीतर्फे चित्रीत लघुपटात नवोदित अभिनेत्री आरती गायकवाडचे अवघ्या काही तासांत हुबेहुब शिल्प मातीमध्ये साकारताना कुणाल दिसणार आहे. या लघुपटात कुणालच्या शिल्प कौशल्यासोबतच त्याचा भाऊ, प्रसिद्ध बाल बासरी वादक धवल जोशी हा देखील बासरीचे सूर आळवताना पाहता येणार आहे.