|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गावाच्या विकासाची आस असलेला कार्यकर्ता निवडा!

गावाच्या विकासाची आस असलेला कार्यकर्ता निवडा! 

पणदूर : गावाबद्दल विकासाची आस असलेला कार्यकर्ता निवडा व त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमधील व्यूहरचनेविषयी चव्हाण यांनी पावशी जि. प. मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, बाबा मोंडकर, चारुदत्त देसाई, सदा अणावकर, वैभव परब, उषा आठल्ये, सर्फराज नाईक, दया अणावकर, नीलेश तेंडुलकर, राजू राऊळ, गजानन वेंगुर्लेकर, वर्षा उगवेकर, देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, सशक्त भारत बनविण्यासाठी सशक्त नागरिक बनणे आवश्यक आहे. सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवा. सरकारचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहचवा. लवकरच मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण होत आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यतत्परतेने लवकरच हा मार्ग पूर्ण होईल व कोकण विकासाला चालना मिळेल. पर्यटन जिल्हा असल्याने मोठय़ा प्रमाणात समृद्धी येईल. मोठय़ा प्रमाणात पर्यटक येऊन या भागातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढेल. भविष्यात काय करायचे आहे. त्याबद्दल विकास आराखडा सरकारने बनवून त्याप्रमाणे काम करीत आहे.

सरकार करीत असलेले काम लोकांपर्यंत पोहचवा. लोकांना समोर ठेवून योजना राबविल्यास विकास होईल. अलिकडेच कासारटाका येथे वाहून मृत्यू झालेल्या सोमेश पाटकर याला सरकारतर्फे चार लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. गावाबद्दल विकासाची आस असलेला कार्यकर्ता निवडा व त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करा. रस्ते, पर्यटन विकास भाजप करीत आहे. त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. केंद्र व राज्यात भाजप सरकार त्याप्रमाणे सरपंच भाजपचा आणून गावाचा विकास करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

जठार म्हणाले, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांत असली पाहिजे. पंधरा वर्षे माशा मारत बसण्याव्यतिरिक्त काम केले नाही, म्हणून मासे फेकून मारण्याची वेळ आली. पर्ससीन, पारंपरिक प्रश्न जुना आहे. तो वाद राणे यांना मिटवता आला नाही. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचार रोखला जात आहे. काका कुडाळकर यांनी प्रास्ताविक केले. हुमरमळा येथील अशोक पालव यांनी महामार्ग मोबदला वाटपातील त्रुटी मांडल्या.

Related posts: