|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत वॉशिंग मशिनचा स्फोट

सावंतवाडीत वॉशिंग मशिनचा स्फोट 

सावंतवाडी :

शहरातील भटवाडी येथील घरात वॉशिंग मशिनचा स्फोट होऊन मोठी हानी झाली. यावेळी कुटुंबीय बाजूच्या जुन्या घरात गेल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना गुरुवारी दुपारी राजू सुभेदार यांच्या निवासस्थानी घडली. कुटुंबीय व आजुबाजूच्या नागरिकांनी धाव घेत आग विझविली. या घटनेत सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

राजू सुभेदार यांच्या पत्नी स्नेहा यांनी आपल्या नवीन घरातील वॉशिंग मशिन सुरू केली. मशिन सुरू करून त्या आपल्या जुन्या घरात गेल्या. काहीवेळाने नवीन घरातून मोठा स्फोट होऊन खिडक्यांतून धूर आला. शेजारील रहिवाशांनी धूर येत असल्याचे पाहून सुभेदार यांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. तेव्हा वॉशिंग मशिन जळत असल्याचे दिसले. नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविली. मशिन पूर्णतः जळाली. स्फोटाने घरातील भिंतीही धुराने काळ्या झाल्या. आग तातडीने विझविल्याने घरातील अन्य वस्तू सुरक्षित राहिल्या. मात्र, स्फोटात सुभेदार यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले.

नगराध्यक्ष बबन साळगावकर, स्थानिक नगरसेविका दीपाली भालेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वॉशिंग मशिनचा स्फोट होऊ शकत नाही. पीसीपी शॉर्ट झाला तरच मोठा आवाज होऊन मशिन शॉर्ट होऊ शकते, असे वॉशिंग मशिन मेकॅनिक राजू पास्ते यांनी स्पष्ट केले. वॉशिंग मशिनचा कधी स्फोट झालेला पाहिलेला नाही. स्पार्किंगमुळे हे घडले असावे. या प्रकाराने कुणी घाबरून जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: