|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जिंका किंवा मरा !

जिंका किंवा मरा ! 

 बीजिंग :

डोकलाम वादावर चीनच्या एका माजी मुत्सद्याने भारतासमोर 3 पर्यायच असल्याचा दावा केला. भारताने डोकलाममधून स्वतःच मागे हटावे किंवा त्यावर कब्जा करावा, अन्यथा चीनने हल्ला केला तर तो संपेल असे मुंबईतील चीनचे माजी उच्चायुक्त लियु योउफा यांनी म्हटले. योउफा यांनी सरकारी वृत्तवाहिनी सेंट्र टेलिव्हिजनशी बोलताना ही टिप्पणी केली. लियु आता रणनीतिक प्रकरणांचे चिनी तज्ञ आहेत. जेव्हा सैनिक सीमा ओलांडतात, दुसऱया देशाच्या सीमेत जातात, तेव्हा ते शत्रू ठरतात, याचे 3 परिणाम होऊ शकतात, ते स्वमर्जीने मागे हटावेत, किंवा त्यांनी क्षेत्रावर कब्जा करावा. नाहीतर वाद वाढल्यावर हानीला सामोरे जावे अशी टिप्पणी योउफा यांनी केली.

भारत हुशारी दाखवेल

भारत डोकलाम वादावर समजुतीने काम घेत पाऊल उचलेल याची चीन प्रतीक्षा करतोय. संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही बाजूंकरता हेच योग्य ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

Related posts: