|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शॉर्टसर्किटने आग लागून गायीचा मृत्यू

शॉर्टसर्किटने आग लागून गायीचा मृत्यू 

प्रतिनिधी /निपाणी :

शेतातील गोठय़ात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गायीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आडी येथे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. सदर घटनेत गोठय़ासह सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आडी येथील बसवंत यल्लाप्पा वराळे हे माळभागावर वास्तव्यास आहेत. गावाशेजारील शेतात त्यांच्या मालकीचा गायींचा गोठा आहे. बुधवारी रात्री बसवंत हे जेवन आटोपून शेतातील गोठय़ाकडे जात होते. यावेळी गोठय़ानजीक गेले असता शॉर्टसर्किटने गोठा पेटल्याचे दिसून आले. यावेळी तत्काळ त्यांनी शेजाऱयांच्या साहाय्याने पाणी मारुन आग आटोक्यात आणली.

यावेळी गोठय़ात दोन गायी होत्या. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एक दोरी तुटल्याने सुदैवाने एक गाय बचावली. मात्र आगीने गोठय़ाचे छत दुसऱया गायीच्या अंगावर पडले. यात गायीचा मृत्यू झाला.