|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठी माध्यमविषयीचा न्यूनगंड बाजूला सारा

मराठी माध्यमविषयीचा न्यूनगंड बाजूला सारा 

प्रतिनिधी /बेळगाव :

मराठीतून शिक्षण घेण्याविषयी मनामध्ये असणारा न्यूनगंड बाजूला सारा, तसेच नव्या तंत्राने स्मार्ट शिक्षण घेण्यासाठी सज्ज व्हा, असे मार्गदर्शन तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर यांनी विद्यार्थ्यांना केले.

तरुण भारततर्फे प्रकाशित होणाऱया यशवंत व्हा या दहावी विद्यार्थ्यांसाठीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन गुरुवारी मराठा मंडळ हायस्कूलच्या सभागृहात झाले. यावेळी मराठा मंडळ हायस्कूल, जिजामाता हायस्कूल आणि सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन ‘यशवंत व्हा’चे उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच दहावी परीक्षेत ‘यशवंत व्हा’ची मदत निश्चित होईल, असा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना उपेंद्र बाजीकर यांनी विद्यार्थ्यांना तरुण भारतच्या उपक्रमांची माहिती दिली. मराठी विद्यार्थ्यांचे हित साधणारा यशवंत व्हा हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. यामुळे दहावी परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचेही त्यांनी सांगितले. 

यशवंत व्हा पुस्तिका आजपर्यंत अनेक मराठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शक ठरून लाभ दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशासाठी कठोर परिश्रम घ्यावेत आणि यशवंत व्हावे, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिल्या.