|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जि. पं. अध्यक्षांना नवे वाहन लाभले

जि. पं. अध्यक्षांना नवे वाहन लाभले 

बेळगाव / प्रतिनिधी :

जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे यांना मंजूर झालेले इनोव्हा वाहन गुरुवारच्या मुहूर्तावर उपलब्ध झाले. वाहन पूजन कार्यक्रम करून ही सुविधा जि. पं. अध्यक्षांना प्रदान करण्यात आली. येथील जि. पं. सभागृहाच्या आवारात हा कार्यक्रम झाला.

जिल्हा पंचायत अध्यक्षांना वाहनभाग्य लाभणार की नाही. याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला मागील आठवडय़ात पूर्णविराम मिळाला. त्यानंतर प्रत्यक्षात गुरुवारी इनोव्हा जि. पं. आवारात दाखल झाली. जि. पं. चे सीईओ आर. रामचंद्रन यांनी या वाहनाच्या चाव्या अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्याकडे सोपविल्या.