|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी मनपाकडून दक्षतेची पावले

संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी मनपाकडून दक्षतेची पावले 

प्रतिनिधी /बेळगाव :

नाला स्वच्छतेची अर्धवट मोहीम आणि नानावाडी येथील तलावातील पाणी नाल्याला आल्याने मागील वषी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे यंदा पुन्हा अशी परिस्थिती निर्माण  होवू नये याकरिता महापालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गुरुवारी सकाळी महापौर, आयुक्त शशीधर कुरेर यांच्यासह अभियंत्यांनी नानावाडी तलावाची पाहणी करून त्यातील पाणी सोडण्याची कारवाई करण्यात आली.

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱया पावसामुळे शहरातील नाले व गटारी तुडूंब भरून वाहत आहेत. पण नाल्याच्या पाण्याचा फटका अद्याप तरी नागरिकांना बसला नाही. मात्र गटारी तुंबल्याने गुडशेड्स रोड, महाव्दार रोड तसेच गजानन महाराज नगर परिसरात पाणी साचून समस्या निर्माण झाली. पावसाचा जोर सुरूच राहिल्यास नाल्याच्या पाण्यात वाढ होवू शकते. त्याचप्रमाणे नानावाडी परिसरातील तलाव आणि खडीमशीन येथील खड्डे भरून पाणी वाहू लागल्यास नाले तुडूंब भरून वाहून पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे.

यामुळे गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, शहर आभयंते आर. एस. नायक, शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर आणि कार्यकारी अभियंते डी.ए.हलगी, साहाय्यक कार्यकारी अभियंते आर. ए. शेट्टर, पर्यावरण साहाय्यक अभियंते उदयकुमार तळवार, साहाय्यक अभियंत्या मधुश्री आदींनी नानावाडी  तलावाची पाहणी केली.

 शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्यावतीने तलावातील पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तलावाला चर मारून पाणी सेडण्यात आले. त्याचप्रमाणे तलावामधील पाणी नाल्यात सोडल्यामुळे कोणत्या परिसरात पाणी घुसले आहे का याची पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱयांनी नानावाडी, मराठा कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर, कपिलेश्वर कॉलनी आणि समर्थ नगर आदी परिसराची पाहणी करण्यात आली.