|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नागालँड विधानसभेत जेलियांग यांचे बहुमत

नागालँड विधानसभेत जेलियांग यांचे बहुमत 

कोहिमा :

नागालँडचे मुख्यमंत्री टीआर जेलियांग यांनी शुक्रवारी विधानसभेत बहूमत सिद्ध केले. दोन दिवसांपूर्वीच आठवडाभरातील नाटकीय घडामोडीनंतर शुरहोजेली लीजिएत्सू यांच्या जागी ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. जेलियांग यांनी सदनात 59 पैकी 47 मते मिळवून आपले बहुमत सिद्ध केल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष इमतीवापांग यांनी दिली. यात एनपीएफ चे 36, भारतीय जनता पक्षाचे 4 तर 7 अपक्ष आमदारांचा समावेश आहे.  तर माजी मुख्यमंत्री शुरहोजेली लीजिएत्सू यांना फक्त 11 आमदारांचा पाठिंबा मिळाला. यात एनपीएफ चे 10 तर 1 अपक्ष आमदाराचा समावेश होता. विधानसभा अध्यक्षांकडून मतदानाची घोषणा करण्याअगोदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात लीजिएत्सू समर्थक 11 पैकी 7 आमदारांनी त्यांचे निलंबन घटनाबाहय़ असल्याचा दावा केला होता. बहुमत सीद्ध केल्यानंतर बोलताना, कॅबिनेट मंत्री परिषद आणि संसदीय सचिवांची पुढील आठवडय़ात निवड करण्यात येणार असल्याचे जेलियांग यांनी सांगितले. तसेच हे सरकार 2018 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा आपला सात महिन्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पुर्ण करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यपाल पीबी आचार्य यांनी गत आठवडय़ात लीजिएत्सू यांना निलंबित करून लीजिएत्सू यांना पद आणि गोपनियतेची शपथ देववली होती.

Related posts: