|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड संघात वेस्लेचा समावेश

इंग्लंड संघात वेस्लेचा समावेश 

वृत्तसंस्था / लंडन

27 जुलैपासून ओव्हलच्या मैदानावर सुरू होणाऱया दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या तिसऱया कसोटीसाठी यजमान इंग्लंडने 13 जणांचा संघ जाहिर केला असून इसेक्सचा फलंदाज टॉम वेस्ले तसेच डेव्हीड मॅलेन या दोन नवोदितांचा समावेश केला आहे. वेस्ले या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करण्याची शक्यता आहे.

इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पधेंत इसेक्स संघाकडून खेळतांना वेस्लेने आपल्या फलंदाजीत सातत्य राखताना दोन शतकांसह 478 धावा जमविल्या. गेल्या महिन्यात वेस्लेने इंग्लंड लायन्स संघाकडून खेळतांना दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या सरावाच्या सामन्यात नाबाद 106 धावा झळकविल्याने त्याला या तिसऱया कसोटीसाठी संधी देण्यात आली. मिडलसेक्सचा फलंदाज डेव्हीड मॅलेन यालाही या कसोटीसाठी 13 जणांच्या चमूमध्ये निवडण्यात आले आहे. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून उर्वरित दोन सामने अधिक रंगतदार होतील. दक्षिण आफ्रिकेने दुसऱया कसोटीत इंग्लंडचा 340 धावांनी दणदणीत पराभव करून मालिकेत बरोबरी साधली आहे. इंग्लंडने लॉर्डसची पहिली कसोटी जिंकून या मालिकेत आघाडी घेतली होती.