|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला उदगावातून विरोध

जयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला उदगावातून विरोध 

वार्ताहर/ उदगाव

ग्रामीण भागात शुद्ध पाणी नसल्याने सद्या अनेक गावात दुषित पाणी नागरिकांना प्यावे लागते. अशा परिस्थितीत जयसिंगपूर शहराला भुयारी गटास योजना मंजूर झाली आहे. मात्र ते पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडू देणार नाही. यासाठी सर्व कृष्णा काठावरील गावानी ग्रामसभेत भुयारीच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे. तो जिल्हा परिषदेत, जिल्हाधिकारी तहसिलदार यांना निवेदन देणार आहे. तसेच उदगाव जिल्हा परिषद मतदार संघात सर्व प्रश्न सोडविणार जनतेला न्याय देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे यांनी सांगितले.

उदगाव येथे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रभाग सभा उदगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उदगाव सरपंच स्वाती पाटील होत्या. यावेळी कृष्णा काठावरील असलेल्या उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड, हसूर या गावातील विरोध दर्शविला.

यावेळी उदगावच्या सरपंच स्वाती पाटील म्हणाल्या, उदगाव गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. तसेच जयसिंगपूर भुयारी गटार योजनेला व ओढा स्वच्छ करून देण्यात यावे, याबाबत म्हणणे मांडले.

घालवाडच्या सरपंच प्रतिभा परिट यांनी मराठी शाळेला शिक्षक देण्याची मागणी केली. तर कुटवाड सरपंच सुकन्या पाटील यांनी फिल्टर पाणी, स्मशानभूमी, लाईट, औषधे यांची मागणी केली.

उदगाव पंचायत समिती सदस्य मन्सूर मुल्लाणी व अर्जुनवाड पंचायत समिती सदस्या तथा उपसभापती कविता चौगुले यांनी उदगाव जिल्हा परिषद मतदार संघ अग्रेसर करणार असल्याचे सांगितले. तर सर्वानुमते ठराव मंजूर करून भुयारी गटारच्या विरोधात ठराव करून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना देण्याचे ठरविले.

स्वागत ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदार यांनी केले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी केले. यावेळी शाखा अभियंता एस. एस. देशमुख, बी. आर. चव्हाण, अनंत माने, फारूख नालबंद, पंकज मगदूम, शिवाजी कोळी, गटविकास आ. काळगे, सविता ठोमके, प्रमोद चौगुले, सुनिता चौगुले, अनिल सुतार, प्रकाश बंडगर, सुरेखा गडदू, प्रज्ञा मगदूम, लता वरेकर, पूजा कोळी, माधुरी आंबी यांच्यासह उदगाव मतदार संघातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

Related posts: