|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इचलकरंजी हायस्कूलचा सुरज खोत स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात प्रथम

इचलकरंजी हायस्कूलचा सुरज खोत स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात प्रथम 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील  इचलकरंजी हायस्कूलचा 5 वी मधील  विद्यार्थी सुरज सचिन खोत हा स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात प्रथम आला. तर याच हायस्कूलचे विद्यार्थी संस्कार संजय पाटील व अपूर्वा अजित वसवाडे हे राज्यगुणवत्ता यादीत चमकले.

       डीकेटीई सोसायटीच्या इचलकरंजी हायस्कूलचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी स्कॉलरशिप परीक्षेत चमकण्याची परंपरा आहे. यावर्षी मात्र या शाळेच्या 5 वी मधील सुरज खोत या विद्यार्थ्याने स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावत नवा इतिहास रचला आहे. तसेच यावर्षी जिल्हा गुणवत्ता यादीत 5 वीचे 21 व 8 वीचे 26 विद्यार्थी असे एकूण 47 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत सुरज खोत, अपुर्वा वसवाडे, संस्कार पाटील, श्रवण बागडे, दिया केटकाळे, मधूरा मुरदंडे, पार्थ सुर्वे, मानसी पटेकरी, श्रीरंग कुलकर्णी, श्रध्दा पाताडे, अनंत जाधव, पूजा पाटील, समृध्दी तेरवाडे, सिध्दी चौगुले, यश पोतदार, आयुष रायनाडे, सिध्दी पोतदार, सतेज खोत, नंदिनी डोंगरे, मृदूला जिरगे, रोहित कलाजे, सुशांत पाटील, क्षितीज उपाध्ये, श्रावणी म्हेत्रे, तेजस्विनी पाध्ये, उत्कर्षा कुंभार, ऋतुजा पोळ, नयन तांबवे, चिन्मय माळकर, साक्षी उपाध्ये, आदित्य पोवार, अरिहंत बेडक्याळे, वैभवी उपाध्ये, पौरवी कस्तुरे, आदित्य इंगळे, ऐश्वर्या शिवणगी, भक्ती चौगुले, मृण्मयी वसवाडे, मनाली वास्के, सायली शिरगांवे, दिया बोरा, अर्पिता वायचळ, संकेत कुलकर्णी, सानिया मुल्ला, सुयश टोणपे, श्लोक दवंडे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

   यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव सौ. सपना आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.  या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा प्रमुख यु. ए. हवालदार, सौ. आर. आर. मिठारी यांच्यसह सौ. व्ही. व्ही. जालीहाळे, सौ. व्ही. बी. सावळवाडे, सौ. एस. एस. पाटील, यु. व्ही. कोकतरे, एस. टी. बांबेर, पी. बी. कांबळे, एम. आर. घुबडे, सौ. एस. पी. लोटके या शिक्षकांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापिका सौ. व्ही. एच. उपाध्ये, पर्यवेक्षक यु. पी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

Related posts: