|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागलमधील साई मंदिरातील दान पेटी फोडून रोकड लंपास

कागलमधील साई मंदिरातील दान पेटी फोडून रोकड लंपास 

प्रतिनिधी/ कागल

येथील बसस्थानकाजवळ असलेल्या श्री साई मंदिरामध्ये अज्ञात चोरटय़ाने 21 रोजी पहाटे मंदिरात प्रवेश करुन तेथे असलेल्या दोन दानपेटय़ा फोडून अंदाजे 35 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सदर अज्ञात आरोपीने मंदिराच्या दक्षिण बाजूकडून मंदिराच्या आत प्रवेश केला. मंदिराच्या शिखराच्या बाजूने त्याने गाभाऱयात प्रवेश केला. याठिकाणी असलेले ग्रील त्याने उचकटले. या ठिकाणाऱया असणाऱया दोन्ही दानपेटय़ांची कुलपे तोडून त्या पेटय़ांमध्ये असलेली 10, 20 पासून 2 हजार रुपयांच्या नोटांची जवळपास 35 हजार रुपयांची रोकड लंपास केली. सकाळी मंदिराचे ट्रस्टी राहुल जयवंत कौलवकर यांनी याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली.

सांगली येथून ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ञांना पायमोजे व हातमोजाचे ठसे आढळून आले. चोरीचा उलगडा करण्यासाठी श्वानपथकासही पाचारण करण्यात आले होते. यापूर्वी एकदा या मंदिरात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. यावेळी मात्र चोरटे चोरी करण्यात यशस्वी झाले. पोलीस निरीक्षक संजय भांबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पठाण या घटनेचा तपास करीत आहेत.

 

Related posts: