|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लज तालुक्यातील कला, क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार

गडहिंग्लज तालुक्यातील कला, क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

शासनाने कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका निम्म्याने कमी केल्या आहेत. याचा परिणाम विद्यार्थी खेळाडू व शारीरिक शिक्षक यांच्यावर होणार आहे. शासनाच्या या धोरणाविरूद्ध गडहिंग्लज तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना शुक्रवारी देण्यात आले.

शासनाने शारीरिक शिक्षण आणि कला यासाठी ठेवण्यात आलेले शालेय वेळापत्रकातील तास निम्म्याने कमी केले आहेत. याचा परिणाम विद्यार्थी खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेवर होणार आहे. तास कमी झाल्यामुळे शाळेतील शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. त्यामुळे कला व शारीरिक शिक्षकांनी आंदोलन छेडण्याचे ठरविले आहे. यासाठीच 2017-18 या शैक्षणिक वर्षात होणाऱया शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गडहिंग्लज तालुका स्पोर्टस् टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने सदर निवेदन देण्यात आले. यावेळी टी. बी. चव्हाण, सुरेश मगदूम, अनिल पाटील, विनायक नाईक, संपत सावंत, रमण लोहार, बाळासाहेब कुंभार, व्ही. आर. पाटील, पवन सुर्यवंशी, नारायण होडगे, सचिन मगदूम यांच्यासह गडहिंग्लज तालुक्यातील कला व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

 

Related posts: