|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बावचीत धारधार शस्त्राने पत्नीचा खून

बावचीत धारधार शस्त्राने पत्नीचा खून 

हर/ आष्टा

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून करुन मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातील बावची येथे घडली. या घटनेने वाळवावार्ता तालुक्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आष्टा पोलिसांनी पतीवर गुन्हा नोंद केला आहे.

सौ. अक्काताई यशवंत पडळकर (25) राहणार लोणार, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, सध्या राहणार बावची ता. वाळवा असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून आष्टा पोलिसांनी तिचा पती यशवंत शामराव पडळकर याच्यावर गुन्हा नोंद  केला आहे. याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आक्काताई व यशवंत यांचे काही वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर या दाम्पत्यास पांडुरंग (9वर्षे) व प्रशांत (6वर्षे) ही दोन मुले झाली. आक्काताई व यशवंत हे मोलमजुरीचे काम करीत होते. आक्काताई व काशीनाथ यांचे प्रेमसंबंध होते. गतवर्षी आक्काताई या लोणार येथे गणपती सणासाठी राहावयास आल्या होत्या. त्यावेळी त्या घरात कोणासही काहीही न सांगता खैराव ता. जत येथील काशीनाथ विष्णू करडे याच्याबरोबर पळून गेल्या. याबाबतची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली होती.

चार महिन्यानंतर काशीनाथ याने आक्काताईला सोडून दिले. त्यामुळे भाऊ बापू पोपट काळे हा आक्काताईला घरी घेऊन आला. त्यावेळी आक्काताईची आई बायाजबाई, वडील पोपट काळे, भाऊ बापू काळे, आजी अनुसया सोलनकर व आक्काताई हे सर्वजण ऊसतोडणीच्या कामाच्या निमित्ताने बावची येथील रंगराव पाटील यांच्या शेतात कामास होते. त्यानंतर आक्काताईचा पती यशवंत पडळकर हा बावचीत आला. व तो आक्काताई बरोबर राहू लागला. मात्र गेली दोन महिने आक्काताई पळून गेल्याचा राग मनात धरुन आक्काताई हिच्याबरोबर भांडण वारंवार भांडण काढीत असे. तसेच मारहाणही करीत होता.

यातूनच गुरुवार, 20 रोजी यशवंत याने पत्नी आक्काताई हीच्या गळय़ावर, नाकावर, तोंडावर व दोन्ही हातावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला. तसेच आक्काताई हीचे प्रेत मोहन कामेरीकर यांच्या विहिरीत टाकला. शुक्रवारी सकाळी आक्काताई हीचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. आष्टा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या खूनाची बातमी समजली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर आक्काताई हिची बहीण सुनिता गोविंद सोलनकर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पती यशवंत पडळकर याच्यावर गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.