|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » झीरो पेन्डन्सीची पंचायत समिती आणि झेडपीत लगबग

झीरो पेन्डन्सीची पंचायत समिती आणि झेडपीत लगबग 

प्रतिनिधी/ सातारा

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच विभागातील झिरो पेन्डन्सी करण्याचे काम सध्या सुरु आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सर्वच विभागात रेकॉर्ड सॉर्टींगच्या कामांची लगबग सुरु आहे. सातारा पंचायत समितीत तर चक्क सभापतीं मिलिंद कदम यांनी सातारा पंचायत समिती या कामात कुठे मागे राहता कामा नये यासाठी स्वतः हे काम करुन घेत आहेत.

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या उपक्रमाची तात्काळ अंमलबजावणी करतात. त्यामध्ये ऑयडॉल सातारा जिल्हा परिषद कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील राहतात. त्यांनी झिरो पेन्डन्सी याही उपक्रमातंर्गत सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना तशा सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये बांधकाम उत्तर, बांधकाम दक्षिण, ग्रामपंचायत, शिक्षण प्राथमिक, माध्यमिक, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन यासह सर्वच विभागात झिरो पेन्डन्शीची लगबग सुरु आहे. आलेल्या तक्रारीचे अर्ज, दिलेले प्रस्ताव, केलेली कामे, या सर्वांच्या फाईलींचे सॉर्टिग सध्या सुरु आहे. तसेच सातारा जिह्यातील 11 पंचायत समितीमध्येही हे काम सुरु आहे. कराड, सातारा, पाटण, फलटण, वाई, खंडाळा यासह सर्व गटविकास अधिकाऱयांकडून पंचायत समितीमध्ये झिरो पेन्डशीचे कामकाज वेगाने सुरु आहे. सातारा पंचायत समितीमध्येही दस्तुरखुद्द सभापती मिलिंद कदम आणि उपसभापती जिंतेंद्र सावंत यांनी लक्ष घातले आहे. कुठेही सातारा पंचायत समिती मागे राहू नये यासाठी पंचायतीतील सर्वच विभागाना सुचना करत स्वत गटविकास अधिकारी गावडे यांच्याकडून काम करुन घेत आहेत. त्यामुळे सातारा पंचायत समितीमध्ये लगबग दिसत होती.

Related posts: