|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विनयभंग करणाऱया मुख्याध्यापकास दिड वर्षाची कारावासाची शिक्षा

विनयभंग करणाऱया मुख्याध्यापकास दिड वर्षाची कारावासाची शिक्षा 

प्रतिनिधी/ सातारा

शाहुपुरी येथील लोकमंगल हायस्कुलचे मुख्याध्यापक विनायक प्रल्हाद फरांदे (रा.आनेवाडी ता.जावली) यांनी त्याच शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकारणी येथील आठवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.माने यांनी मुख्याध्यापक विनायक फरांदे यांना दीड वर्षाची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. शिक्षणक्षेत्रात अशा प्रकारे शिक्षा लागल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहुपुरी येथील लोकमंगल हायस्कुल मध्ये मुख्याध्यापक विनायक फरांदे यांनी त्याच शाळेतील एका शिक्षिकेचा विनयभंग केला. त्यानंतर सदर शिक्षिकेने याबाबत 27 जानेवारी 2015 रोजी याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुह्याचा तपास महिला हवलदार माधुरी कांबळे व हवलदार हसन तडवी यांनी करुन याबाबतचे दोषारोपत्र न्यायालयात हजर केले.

याबाबत सरकार पक्षाच्यावतीने ऍड. व्ही.आय.बडवे, बी.ए.देशमुख, एम.जे.यादव यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेले पुरावे ग्राह्य मानुन न्या. एस.बी.माने या 1 वर्षाची सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास6 महिने साधी कैद व 2 हजार रु. दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली

Related posts: