|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’

‘उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’ 

सिनेमात काम करता करता करतोय लॉ, बाल कलाकार ते मराठी चित्रपटातील अभिनेता चिन्मय संत

प्रतिनिधी/ सातारा

4 ऑगस्टला संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होणाऱया उंडगा या चित्रपटातील नायक चिन्मय संत याचाच जीवनपट एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणेच आहे. तो बालपणापासून अभिनय करत आहे. पाठीवर वडिलांची सावली नसताना आज तो सिनेमाचे चित्रीकरण करत असताना पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमध्ये लॉच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. उंडगा या चित्रपटातील नायक असलेला या ‘गण्या’चा खरोखरच्या जीवनातील लढा मात्र महाराष्ट्रातील युवकांना ‘उंडगा’ बना असे सांगणारा आहे.

पुणे तिथे काही नाही उणे या प्रमाणे चिन्मय संत यांचे वडिल कोथरुडमध्ये इलेक्ट्रीशनची कामे करत, आपली मुलगी आणि मुलगा चिन्मय याला शिक्षण देत होते. चिन्मय याला प्राथमिक शाळेत असताना कलाकाराच्या नकला करायचा. त्यामुळे त्याच्या वडिलांनी मुलाचे पाय पाळण्यात ओळखूनच. त्याला प्रकाश पारखी यांच्या नाटय़ कला ऍकॅडमीत दाखल केले. या ऍकॅडमीत सुबोध भावे, अवधूत गुप्ते यांच्यासारख्या कलाकारांनी नशिब आजमवले. तसे चिन्मयला पहिली पहिला चित्रपट बाल कलाकार म्हणून मिळाला. तो सातवीमध्ये असताना ताऱयांचे बेट. प्रमुख भूमिका असलेल्या ईशानच्या मित्राची. ती भूमिका कसदारपणे चिन्मयने केली. आठवीमध्ये त्याला जन गण मन हा चित्रपट तर 9 वी मध्ये टुरिंग टॉकी आणि दहावीमध्ये 72 मैल हे चित्रपट केले. अभ्यास करत करत हे चित्रपट तो करत होता. दहावीमध्ये असताना मात्र परीक्षेच्या कालावधीत त्याचे वडील त्याला सोडून गेले. तरीही खचून न जाता चिन्मयने आई आणि बहिणीच्या आर्शिवादावर वाडिया कॉलेजमध्ये अकरावीत प्रवेश केला. अभिनयाची आवड मात्र त्याला गप्प बसू देत नव्हती. पुण्याच्या फिल्म टेलिव्हीजन इन्स्टिटयुटमधून शॉट फिल्म करत होता. असे असताना ई टीव्हीच्या क्राईम डायरी या मालिकेतील पाच भागामध्ये भूमिका केली.  चिन्मयच्या कुटुंबियांकडून डिग्री तुझ्याकडे हवी आहे, असा हट्ट केल्याने त्याने मॉर्डन कॉलेजला लॉ ला प्रवेश घेतला. सध्या तो शेवटच्या वर्षात शिक्षत आहे. त्याची बहिण पुण्यात शास्त्रज्ञ आहे. अशी जीवनगाथा असलेला चिन्मय संत हा मराठीतील उगवता अभिनेत्याचा नुकताच 4 ऑगस्टला उंडगा हा चित्रपट येत आहे. त्याबाबत चिन्मय म्हणाला, मला सिनेमात करिअर करायचे आहे. लॉ चा अभ्यास परीक्षेच्या एक महिना अगोदर करतो. वर्षभर शुटींगमध्ये व्यस्त असतो. येवू घातलेला चित्रपट हा मित्रावर कथानक असलेला आहे, असे त्याने तरुण भारतशी बोलताना सांगितले.